हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात.
मी चालताना ते माझ्या सोबत चालतात.
मी बोलताना ते मन लावून ऐकतात.
माझ्या वाटेतील काटे
हळुवारपणे बाजूला सारतात.
कारण,
हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात.
आईसारखी माया करतात,
बापासारखी छाया धरतात.
भावासारखे कधी भांडते हि मी त्यांच्याशी,
आणि ते हि अचानक एखादे संकट आणून
माझी मजा पाहतात.
कितीही संकटे आली तरी
मी कधीच हार मानत नाही,
कारण,
हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात.
माझे आयुष्य, माझे अस्तित्व
आणि माझा प्रत्येक चालू श्वास
ही त्यांचीच कृपा आहे.
म्हणून मला त्रास देणारे
नेहमी माझ्या मागेच राहतात.
कारण,
हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात.
मनात साचलेले दुःख
समजून घेणारे कोणी नसते.
म्हणून त्यांच्याजवळ
मन मोकळे करायला मला आवडते.
कारण खात्री आहे,
ते गादीवर विराजमान असले तरी
मला लागणाऱ्या प्रत्येक झळेचा चटका
त्यांनाही जाणवतो.
कारण,
हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात.
आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारात
ते नेहमी माझी पाठराखण करतात.
कधी माझ्याकडून चूक झालीच,
तर हक्काने रुसूनही बसतात.
मनातील प्रत्येक इच्छा
हळूहळू पूर्णही करतात.
कारण पुन्हा तेच...
हो, माझे स्वामी माझ्या सोबत असतात...
समासात एक विचार नोंदवा